पहिला पाऊस नवतीचा
पयल्या पावसाची बातच न्यारी
धिंगाना घालतंय पन वाटतंय भारी
ढगांचा गडगडाट,विजेचा कडकडाट
वाऱ्याची सांय सांय अन झाडांची सळसळ
असं काही संगीत की धडकी भरवतं
भल्याभल्यांची बघा मस्ती जिरवतं
पहिल्या पावसाची बातच न्यारी
धिंगाना घालतंय पन वाटतंय भारी
चिमण्या पाखरं मातर बेघर हुतात
माह्या भावना तवा लय कातर हुतात
शेतातला दाना जणू मातीचाच व्हता
मातीमोल घाम, आसवाले पार नोता
पयता भुई थोडी जवा कास्तकाराले व्हते
मावं मन देवा तुया पायाशी येते
नको रागू भरू असा, आमी तुहीच लेकुरे
तुह्या वाचून देवा आमचं पोट कसं भरे
पयला पाऊस पायतानी जरी मन हरिकते
दीनवानी दशा कशी कानू मले ना पाहावते
पडो पयला पाऊस जोमानं जरासा
धरती वरच्या जीवायले देवून दिलासा
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home