Friday, 19 June 2026

आठोळी:- कुणी नाही पाहिलं

आठोळी:- कुणी नाही पाहिलं 

कसं होणार जगाचं ह्या कुणी नाही पाहिलं 
धरतीच्या पोटात आता तेलच फक्त राहिलं 
पाणी झालंय बाटलीबंद, स्पंजबाथ वर काम आलं 
भर ए सी मध्ये अंग सारं घामानं भरून आलं 
एल नीनो दाखवी वाकुल्या यंदाच्या मान्सून ला 
शेतकरी बेहाल बांधावर कावला या उन्हा ला 
कॉंक्रिटच्या जंगलातील माणसंही आता धास्तावली 
सृष्टीच्या शोषणा साठी तरी कुणी नाही पस्तावली 
कवि 'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home