Tuesday, 7 March 2023

राम रंगाची होळी

राम रंगाची होळी खेळुया सकळ
राम नाम करी मन वाचा ही निर्मळ
रामप्रभूसी जव त्या स्मरिले
दु:ख अवघेचि तयाने हरिले
नाश पावे जे ते सर्व अमंगळ
राम रंगाची होळी खेळुया सकळ
साऱ्या जीवितांचा राम तो कैवारी
रावणासी देखा तो मुक्ति देवुनी वारी
रामनाम ची साक्षात अमृताचे बळ
राम रंगाची होळी खेळुया सकळ
सखा हनुमंत तया शक्ती उपासक
राम रुपी शक्ती अन तो रामाचा सेवक
राम भक्ती चे तेज हे अतर्क्य प्रबळ
राम रंगाची होळी खेळुया सकळ
कवि 'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home