Wednesday, 18 January 2023

गझल

आयुष्याच्या उतरंडीला
पुन्हा स्वप्न पडतील कसे!
वठलेल्या ह्या वृक्षाला कां 
नवी पालवी फुटत असे?

मी मजला सिंचीत राहिलो 
अग्नीच्या वणव्याने!!
देह जरी तो वज्रासम 
मन अंतरी पण विद्ध असे!

दाता जरी तो एकची असला 
तरी विषम ते दान पडे
मरताना ही शेवटचा क्षण 
कां कधी आपुला होत असे ?

देत रहावे रक्त ही अपुले 
तमा कशाची करू नये
जगण्यातील क्षण एक पुरे 
जो जगती हो अमर असे

'रवि' तुझ्या कविता श्रवताना 
बधीर जाहले जन हे सारे 
अरण्य रुदन ठरते त्यां साठी
कां तुजला जाणीव नसे ?

कवि 'रवि'




0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home