Tuesday, 10 December 2024

आयुष्याच्या उतरंडीला

आयुष्याच्या उतरंडीला 
तत्पर रहावे कोणत्याही प्रसंगाला 
मिटवा मी पणा जो अंगी आला 
प्रपंचा कारणें 
आता एकची चिंतन 
मन व्हावे निर्मळ, वृत्ति सज्जन 
कधी असो नये भयासी कारण 
वर्तन अपुले 
संतांच्या ठायी सदा चित्त 
घडू नये क्रोध, कृती उन्मत्त 
अंतिम लक्ष्य व्हावा मोक्ष प्राप्त 
योनिचक्र स्थिरावया 
'रवि' म्हणे भागवत धर्म 
निष्काम असावे कर्म 
हेंचि असे हो मर्म 
मनुष्य जन्माचे 
आला आला यमदूत 
जिव्हें बोलावा अवधूत 
टाकुनिया मृत्यूची भ्रांत 
मार्ग क्रमण करावा 
ॐ विष्णवे नमः 
ॐ नमः शिवाय 
शांति: शांति: शांति:
कवि 'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home