अव्यक्त
मनातील मोकळ्या जागा
कळेना व्यापिल्या केंव्हा तुझ्या त्या दिव्य स्पर्शाने
ऊरी त्या साठल्या केंव्हा ऋणातील अव्यक्त मन माझे
सदा अर्पीत राहिले असे ते फेडु शकलो ना
कळेना घेतले केंव्हा ऊभा रस्त्यावरी कां
तो असा संदर्भ सोडोनी तयाने पाश जन्मांचे
असे झिडकारले केंव्हा अकल्पित ओढ ती असते
परी भय साथ सोडेना ऊसासा अंत पर्वाचा
अचानक उद्भवे केंव्हा मना बा सांग तू
ऐसे जगाला काय ते दिधले तुवा पाषाण जे पुरले
जगाने मानले केंव्हा
कवि 'रवि' © रवींद्र सरदेशमुख

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home