Thursday, 10 June 2021

नश्वरता आणि स्वप्ने

अंधाराच्या गर्भात प्रयत्नांची काठी रोवून
वाट काढतोय........... वाटसरू
शत सहस्त्र वर्षांपासून 
अंधारच फाडतोय 
परास्त होतोय ...........वाटसरू
एक प्रकाशकिरण 
दिसल्या क्षणी धावतोय
मृगजळात फसतोय..... वाटसरू
कल्पनेचाच ध्यास
कल्पनेचीच भरारी 
कल्पनेतच क्षिरतोय .....वाटसरू
एका क्लान्त समयी 
वास्तवाची जाण व्हावी 
नश्वरता समजावी .......वाटसरूला
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home