राजकारण
प्रस्तावना करण्यासाठी
उघडलेल्या त्याच्या मुखातून
ओसंडत होती दांभिकता
श्रोत्यांच्या माना ही डोलत होत्या
दांभिकतेने
स्तुतीपर शब्दांचा ओघळ
लाळेसारखा
आणि सत्याला भुलविण्यासाठी
टाळ्यांचा कडकडाट
पुढाऱ्यांचा पुजारी आहे म्हणताना
चरकली होती त्याची जीभ एक क्षण
मनाचा कौल घेता घेता
आणि एक शीळक उठली होती शरीरात
पण
लांगूलचालनातून ध्येय प्राप्ती कडे जाण्याचा वसा घेतला होता त्याने इतिहासातून
न्यायपीठावर बसवून प्रश्न विचारला असता त्याने समजाविले होते
राजकारण
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home