विचार करा
जरा थांबा
धावत्या दुनियेला, कुणी अडवाल का हो
त्या पांगळ्याला कुणी हात द्याल का हो
जन्मतःच चंद्रावर
झेप घेणाऱ्या अपोलोला
अस्तीत्वाचा अर्थ सांगाल का हो
चॅलेंजर सारख्या
अर्भकांची भ्रूण हत्या
थांबवाल का हो
पृथ्वी वरील पाहुण्यांना रेडीएशनची मेजवानी
संपवाल का हो
अथपासून इति पर्यंत
पोचण्याच्या घाईत
सर्वस्व इति होतेय
हे बघाल का हो
व्यक्ति भेदा पोटी आता
ब्रम्हांडाची युद्ध भूमी घडवाल का हो ?
धावत्या दुनियेला कुणी अडवाल का हो....
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home