विस्फोट
वाढत्या लोकसंख्येसह मागणी-उपभोक्ता-पुरवठा-विक्री व्यवस्था अशा सर्वच क्षेत्रात अनाकलनीय आणि अमर्याद बदल होत आहेत. प्रत्येक देशात लोकसंख्या विस्फोटक स्वरूप धारण करून विकासाच्या मार्गातील मोठा अडथळा बनला आहे. विडंबना अशी की हा विस्फोट देशांना विकासासाठी सहाय्यक जनतेचा नसून अनुत्पादक आणि परिणामी शोषण करणाऱ्या जनसमुदायांचा आहे. ह्या विदारक स्थिती ला जोड आहे ती कृत्रिम किंवा आभास निर्माण करण्यात निष्णात झालेल्या प्रसार माध्यमांची. सत्याची कत्तल करून हानिकारक अजेंडा राबविण्यात पत्रकारिता कुजून गेली आहे. हिंदु समुदायाची दिशाभूल करत त्यांचं शोषण सर्व प्रकारे होत आहे. वाढती महागाई हा जगभरातील माफियांच्या मुठीत जकडलेल्या राजकारण्यांच्या दरिद्री मानसिकतेचा परिपाक आहे. गुणवत्ता संपन्न मानवी जीवन हे पुढील काही शतकांपुढील आव्हान ठरणार आहे.

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home