Sunday, 5 September 2021

मातृदिनाच्या निमित्ताने

जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी। मातृभ्यां नमः, मातृदेशोभ्यां नमः 🙏 हे माय माऊली जन्म दात्री तू विलक्षण सृजन कर्ती आहेस तुझ्या कुशीत जन्म घेऊन आम्ही राष्ट्र कार्य करण्यास्तव सक्षम झालो आहोत, धर्म कार्य करण्यास्तव त्यागी झालो आहोत. हे माते तुझ्या मायेच्या उबेतून आम्ही विश्वाला प्रेमाची व्याख्या समजावू शकलो आहोत, तू संस्काररूपी वसने प्रदान करून आम्हाला शीलवान बनवले आहेस. चारित्र्याचे सर्वगुण आम्ही तुझ्याच शब्दांतून ओघवणाऱ्या अमृताचे रसपान करून ग्रहण केलेत. तुझ्या अनंत लीलांनी व्याप्त असं हे आमचं जगणं ही तुझी मानवतेला मिळालेली देणगीच आहे. अख्खी मानवजात किमान सनातन धर्माचे पालन करणारे तरी तुझं आमच्या अस्तित्वातील महत्व कधीच विसरणार नाहीत 🙏🌹🙏

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home