क्रांति पुंज
क्रांतिपुंजांचे ते रूप
क्रांतिकार्याचे स्वरूप
पोवाडा गाउनिया त्यांचा
अंगी उसळावा हुरूप
देश अन स्वातंत्र्य हेची
ब्रीद हो जगण्या तयांचे
उग्र तप, धारिष्ट्य धरोनी
मारुनी मरण्या जयांचे
आज स्मरुनी त्या विभूती
प्रण करू देशाप्रती
जिंकवू अपुल्या स्मृतींना
प्रेम ते राष्ट्राप्रती
प्रेम ते राष्ट्राप्रती........ प्रेम ते राष्ट्राप्रती
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home