राम राम भौ
औंदाच्या गुढी पाडव्यानं भौ कानी भारताच्या राजकारनाले अल्लगच वयन देल्लं हाये भौ. कसं म्हंता? तं भौ पाहा ना तिकळे त्या राहुल बाबा नं भारत जोडो कां काय थे मोहिम काळ्ळी ह्वती ना भौ! पन थे काई नियतीले भावलं नाई राजे हो. हाव ना भौ, राहुल बाबा चा पैशापरी पैसा गेला आन जरा काई दम घेयाचा त्यानं ईचार केला की नाई तं कोर्टानं त्याले दोन वर्साची जेल ची हवा खायाची सजा सुनावली. इतलं कमी झालं का नाई तं त्याले लोकसभेतून काळून टाकलं ना भौ!
आता ह्या सोनिया बाईंनं कराव तरी काय सांगा देवा. तिले पंतप्रधान व्हायाचं व्हतं पन थे काई जमलं नाई तं बिचारी लाडाकौतिकाच्या लेकरात आपलं सपान पुरं कऱ्याले पायत व्हती. आता कोर्टानं थे बी हवा काळून घेतली, तवा त्या माय माऊलीनं पाव्हाव कोनाकळे? सांगा भौ. राजीव गांधी ले तिनं जो काई सबूद दिला अशीन तो काई पुरा व्हतानी दिसत नाई भौ. थ्या पोरीले मंजी पिरयंका बेबीले फुळे कराव तं तिच्या लफडे बाज दाल्ल्यानं जथी नाई तथी माती खाल्ली हाये राजे हो. तिकळे जुने जानते सारे नेता लोक बाईवर रुसून पयलेच वाले व्हून बशेल हायेत भौ. गेला बाजार कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी अन त्यो सदानकदा बयाड्यावानी बोलत ऱ्हायते तो सूरजेवाला इतलेच बट्ट्याबोळ करनारे मानसं भवताल बाकी हायेत भौ. लय लय घोर लागला भौ तिच्या मांगं. मरु पायते बिचारी पन जीव काई निंगत नाई बावा!
मले तं राजे हो लागते कां आता कांग्रेस मुक्त भारत व्हायाचा टाईम जोळ आला भौ. कसा थे बी सांगतो.
भौ जरा ध्यान द्या, तिकळे दक्षिन भारतात तीस पस्तीस वर्स झालीत कांग्रेस दिसली कां कवा? इकळे उत्तर प्रदेशात बिन हवा गुल झाली ३०-३५ वर्स झालीत. बंगाल तं निर्मम ममता बाईनं कवाच कांग्रेस अन कम्युनिस्टाइले मुठमाती दिली. महाराष्ट्रात शरदरावानं कांग्रेसले कायमच धुगधुगी वर ठुयेल हाये आन रायता रायला उत्तर पूर्व भारत तं तिकळे बी आता बी जे पी चा बोलबाला हाये भौ. आलं ना ध्यानात!? कांग्रेस मुक्त भारत व्हायाची तीथ जोळ आली वाट्टे कां नाई तुमाले. माह्या वाला अंदाज हाये कां २०२४ च्या निवळनुकाईच्या पयले एकडाव पुन्ना नोटाबंदी व्हतानी दिशिन भौ.
चला आजच्या साठी लय झालं. पुन्ना भेटूच.
जाता जाता तुकाराम बुवा काय सांगून गेले थे सांगतो.
तुका म्हणे उगे रहावे
जे जे होईल ते ते पहावे.
मंधात एक डाव मोदीजी देहूले जाऊन आले थे काह्याले? आलं का ध्यानात?😃😃😃😃
राम राम भौ.
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home