Monday, 4 March 2024

शरद पुराण


जन्मोजन्मी तुम्ही जात पात केली
म्हणूनी विठ्ठलाने तुमची वाताहत केली.... जन्मोजन्मी तुम्ही
असुनी मराठा तरीही 'कुणबी'नोंद केली
जो ही आला जवळी त्याची दिशाभूल केली
'शरद' असूनी वृत्ती प्रेम आटलेली
स्वार्थ स्वार्थ हीच तुम्ही दिशा आखलेली.. जन्मोजन्मी
'शर' द झालियाने बहू विद्ध केले
गुरू ते ही कुटील पणाने तुम्ही बद्ध केले
परदु:खासी तुम्ही साधन मानीले
अशी कशी वृत्ती तुमची माया आटलेली..... जन्मोजन्मी
'रवि' म्हणे ऐका आता सर्व अती झाले
स्वार्थापोटी तुमच्या तुम्ही असे त्याज्य झाले
मुलं नातवंडं तुमचे किंचित राहिले
लबाड वृत्तीने तुमची अशी दशा केली.... जन्मोजन्मी
जन्मोजन्मी तुम्ही जात पात केली
म्हणुनी विठ्ठलाने तुमची वाताहत केली
कवि 'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home