हात हाती घेतला होता....
हात हाती घेतला होता
तिचा मी ज्याक्षणी
विश्व माझे ते न उरले
लुप्त झाले त्या क्षणी
ती तशी दिवसा प्रखर अन्
रात्री शीतल होतसे
मीच मजला प्राप्ती मानून
धुंद होई त्या क्षणी
जीवची तो गुंतला
जव भ्रमर पंथे लागला
एकदुजां आनंद द्यावा
छंद बनला त्या क्षणी
कां मनाला बोध द्यावा
धीर धरण्या साठीचा
प्रेम देवाचीच करणी
तोही फसला त्या क्षणी
सृष्टी सारी जीव सारे
सृजनास की हो बद्ध आहे
मी ही पामर त्यातला
कैसे चुकावे त्या क्षणी
करुनिया दशकांची संगत
ती न उरली वेगळी
मी न उरलो स्वत्व नुरले
एकत्व उरले त्या क्षणी
गत स्मृतींना जागवाया
वृद्धत्व आहे वेळ आहे
चल 'रवि' स्वप्नात रमण्या
तिच्या सवे मग ह्या क्षणी
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home