आकाश कल्पनांचे
सामर्थ्य हे तमा चे की बुद्धी दोष आहे
भ्रम हा कसा कळे ना ह्याचाच रोष आहे
उठता उधाण लाटा धीरस्त तो किनारा
जरि कां मनात त्याच्या चिंतेस वाट आहे
असले जरी असे तो करी सामना तयाचा
तव थोर जलधि तो ओहोटीस जात आहे
मनातील वादळाला का दिशा ठरवून देतोसी
तुझ्या नादानतेने ते विरोनी जात मग आहे
जमाना आज जो दिसतो उद्याला लोप तो होतो
अकर्मण्यातुनी तुझिया क्रांतिचा ऱ्हास रे आहे
जयाने जन्म हा दिधला तयाला अर्पुनी द्यावा
वृथा अभिमान तुजला हा छळतोचि बघ आहे
दिसतात रोज मरणे जरि कां क्षणाक्षणाला
तरी श्वास हा मजला असा चिकटोनि कां आहे
उधळून जाऊ दे रे अश्वास त्या मनाच्या
आकाश कल्पनांचे तव स्वागतास आहे
आकाश कल्पनांचे...........
..,.........तव स्वागतास आहे
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home