Wednesday, 12 March 2025

राम राम भौ

 म्हणलं होयी च्या बोंबा सुरू व्हायाच्या पयलेच आपन तुमाले साऱ्याइले होयीच्या सुबेच्चा दिवुन वालं व्हाव मंजी मंग अल्लग कायजी करत बश्याचं काम न्हाई भावाइहो.

होयी म्हतली कां साऱ्या हिंदुस्थान भर हौश्या गवश्या नवश्या समद्याइले मोठ्ठा हरिक येते कानि बॉ? आन मी म्हंतो कां तसं व्हायालेई पायजे राजे हो. होयी म्हतली कां मानसाच्या मनातला सारा राग लोभ मद मत्सर द्वेष आन उरलीसुरली अद्वातद्वा बोल्याची हौस सारं काही घिवून जाळून टाक्यासाठीच येते! हौ कानि भौ.

तं आपुनच काहून बॉ मांगं ऱ्हावाव, आपुन बि जायाचं सांच्याले होयी पेटोतिन तवा आन दिऊन टाक्याचं सारं होयी ले. मनातलं ईख दूर झालं कां देव बिन निर्मळ मनाले साजरा दिसते, सपष्ट दिसते आन उरलीसुरली जिनगानी त्याच्या आशिर्वादानं नव्या उल्लासानं जगू पाह्यते मानूस.

तवा भौ घरचं आटोपलं कां जरूर जावू सार्वजनिक होलिका दहन कारेकर्माले आन बिंदास बोंबा घालू तन मन शुद्ध व्हईस्तोवर 

होलिका माता की जय 

भक्त प्रल्हाद की जय 

भगवान विष्णू की जय 

सनातन धर्म की जय 

सकल हिंदू परंपराओं की जय 

भारत माता की जय 

जय श्रीराम 🙏