संत गजानन महाराज भजन
ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर
शेगांवी बसले
मला हे गुरू गजानन दिसले......मला हे
माय माऊली ही भक्तांची
आस एकची असे कृपेची
शेगांवातील सद्भक्तांच्या अंतरात वसले
मला हे गुरू गजानन दिसले......मला हे
तूच दयाळा आम्हां सावली
जन्मे अमुची भरून पावली
दर्शन घडता तुमचे मनांसी ज्ञानार्जन घडले
मला हे गुरू गजानन दिसले....मला हे
आज परमकृपा कल्पतरू महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनी सुचलेले हे कवन श्री सद्गुरू चरणीं अर्पण.
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home