Wednesday, 11 February 2026

निरांजनातील वात जणू ती

निरांजनातील वात जणू ती 
देई मजला प्रभा निरंतर 
तिच्याच साठी प्राण जाहलो 
नुरले आता कसेच अंतर 
अस्तित्वच ते परस्परांवर 
साथ संगती न च गत्यंतर 
जे जे आम्हांसी दैवे दिधले 
ते ते अर्पू तयांसी सत्वर 
'रवि'षड्रिपुंचे नाट्य खरोखर 
त्वां अनुभवले ह्या अवनीवर 
कवि 'रवि' 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home