गुढी पाडवा
आला पाडवा पाडवा
मुखी बाणा हो गोडवा
वर्ष प्रतिपदा आली
मने आनंदाने न्हाली |
कर संकल्प प्रेमाचा
प्रेमाचिया हो नेमाचा
बंधुभाव जपण्याचा
धरू हात गांजल्यांचा
करूनिया रुजवात
राहू सुखात निवांत
व्हावा शत्रुत्वाचा अंत
हेचि द्या हो भगवंत
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home