Monday, 11 October 2021

टिळक गांधी आणि गुरु गोखले

भारतीय स्वातंत्र्याच्या २०व्या शतकातील इतिहासामध्ये लोकमान्य टिळक आणि मोहनदास गांधी ही दोन व्यक्तिमत्त्वे अशी आहेत की ज्यांना गोपाळ कृष्ण गोखले जी सारखे राजकीय गुरू प्राप्त झाले, विडंबना अशी की एक जहाल मतवादी बनला आणि एक मवाळ भूमिका घेणारा ठरला. चरित्र विषयक बोलायचे झाले तर टिळक मरेपर्यंत निष्कलंक जीवन जगले आणि गांधी मात्र अनेक विरोधाभासी चरित्रांचा पुलिंदा बनले. गुरु सुद्धा शिष्य घडवू शकत नाहीत हे गुरु द्रोणाचार्य ह्यांचे कडून समजता येते. टिळक मरेपर्यंत राष्ट्रभक्ती ला समर्पित होते आणि गांधी हत्या होईपर्यंत आत्मकेंद्रित आणि इंग्रजी सत्तेचा पाईक, बहुसंख्य भारतीयांना कस्पट समजून जगत राहिले. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर राजकारणी टिळकांच्या प्रखर राष्ट्रवादी विचारांची उंची गाठू शकले नाहीत परंतु गांधी च्या स्वार्थी कृती प्रकृतीची संगत त्यांना सोईची वाटली. ७४ वर्षांचा काळ लोटला आहे तरीही गांधी नावाची कुबडी घेतल्या शिवाय राजकारण करता येत नाही हा भ्रम काही संपत नाही. मोदींच्या भाषेत एक लकीर को छोटा दिखाना होगा तो दुसरी बडी लकीर बगल में खींचो, ह्या उक्ति नुसार आम्हाला देखील टिळक सावरकर ह्यांचा उद्घोष उत्कटपणे करायला हवा.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home