Sunday, 21 November 2021

मोदी विषयी एक मंथन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांतून घडलेला एक स्वयंसेवक आपल्या आयुष्यातील सर्वकाही राष्ट्रकार्याला समर्पित करतो. राष्ट्र धर्म आणि राष्ट्र कर्म येवढंच काय ते सर्वस्व समजून वयाच्या ऐन उमेदीच्या काळापासून अहर्निश राष्ट्र सेवेला स्वतः ला अर्पून देतो अशा राष्ट्र निष्ठांच्या मांदियाळीतून घडलेला एक म्हणजे भाई नरेंद्र दामोदरदास मोदी होय.
सक्रीय राजकारणात प्रवेश केल्यापासून ज्याने प्रचंड ध्येय निष्ठा अवलंबून एकाहून एक धाडसी तरीही यशस्वी निर्णय घेतले आणि जनतेच्या हिताचे कार्य केले, अशा मोदींचं आकलन करताना आजवर भल्या भल्यांचे भाकित किंवा अंदाज चुकले आहेत. 
गुजरातचे मुख्यमंत्री पद स्वीकारले तेंव्हा पासून तर समग्र भारताचे नेतृत्व करण्याची करामत करण्यापर्यंत ह्या निधड्या छातीच्या आणि धीरोदात्त स्वभावाच्या माणसाने असंख्य वेळा मानसिक ताण सहन केला आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनतेला नुकसान पोहोचेल असा एकही निर्णय केला नाही. 
कृषी विषयक कायदे लागू करताना देखील त्यांनी व्यापक दृष्टिकोन ठेवून ह्या कायद्यांची रचना केली आणि दृढ पणाने अंमलबजावणी केली. वरील कायद्यांना विरोध केला गेला ह्याचं मुख्य कारण त्या कायद्यांमध्ये उणीवा आहेत म्हणून नाही तर ह्या कायद्यामुळे अनेक प्रस्थापित नेते मंडळी आणि त्यांच्या उद्योगांना प्रचंड धक्का बसला आहे. त्यांच्या अघोषित व्यापारिक साम्राज्याचा अंत झाला आहे. हे कायदे लागू होताच अचानक पणे अकाली दलाने भाजपशी काडीमोड घेतला आणि अनेक दशकांपासून प्रस्थापित असलेली युती तोडली ह्या मागचं मूळ कारण त्यांना झालेलं आर्थिक नुकसान हेच होते. न खाऊंगा न खाने दूंगा ह्या मोदींच्या उक्तीला हे कायदे बळ देण्यात पूर्ण पणे यशस्वी ठरलेत.
प्रश्न असा निर्माण होतो की असे असतानाही आज त्यांनी हे कायदे मागे घेण्याची घोषणा कां केली असावी? मला उमगले ते असे की हे कायदे वर्षभर राबवून त्यांना जे इप्सित साध्य करायचे होते ते झाले असावे. शेतकऱ्यांना अंधारात ठेवून किंवा त्यांची फसवणूक करून जे व्यवहार केले जायचे ते आता उघड झाले आहेत आणि शेतकऱ्यांना कळले देखील आहेत. ह्या पुढे त्यांचं शोषण करणं सहजशक्य नाही. किमान आधारभूत किंमत देऊन सरळ रक्कम शेतकऱ्यांना खात्यात जमा करण्यात येते त्यामुळे व्यवहार चोख होत आहे. हे मूलभूत सत्य शेतकऱ्यांना कळले आहे आणि म्हणूनच कायद्यांची आवश्यकता कमी झाली आहे. ह्या पुढे कृषी उत्पादन विक्री ही फायद्यानेच कशी करावी हे स्पष्ट झाले आहे. 
इतक्या उपरही ज्यांना या निर्णयावर शंका आहे त्यांनी संयम बाळगावा, आंदोलनकाऱ्यांचं अरण्य रुदन ऐकू येईल तेंव्हा विश्वास करावा.
रविंद्र सरदेशमुख

Thursday, 11 November 2021

वो चश़्मे नम

वो चश़्मे नम
हया ही नुमाया करती है
गुमां होता है, हो न हो
वो मुझपर ही मरती है
है ख्वाहिश के 
इकबार मिलाप हो जाए
नज़रों के रास्ते 
रुह रुहसे मिल जाए
वो कैसा है आलम
जो बेचैन ही रक्खें 
जुबां तक भी आए
और खामोश भी रख्खें 
कवि'रवि'