Thursday, 30 December 2021

२०२१ बाय बाय

एकविसाव्या शतकातील हे 
एकविसावे वर्ष ही सरले
जे ना बधले कोविड ह्यासी
ते ओमिक्रॉन चे भक्ष्य की ठरले.....१
चीन पाकडे हतबल झाले
तालिबानी ते मुजरते झाले
जो बायडेन सॅल्युट हा करतो
पुतीन अचानक भेटाया येतो........२
फ्रान्स रफाएल देता झाला
एस फोर हंड्रेड सीमेवर आला
गांधी आंधीसवे उडूनी जाती
मोदीची ही अशी की नीती...........३
अता येऊदे वर्ष नवे ते
पूर्वी सारखे व्हावयास हवे ते
जीवन पुन्हा जिवंत होऊ दे
विश्व आनंदे भरुन जाऊ दे..........४
कवि 'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home