Thursday, 20 October 2022

औंदाची दिवायी बिना लाक डौन

राम राम भौ, का म्हंता औंदाची दिवायी लाक डौन च्या बिगर अक्षी लयच हौशीनं साजरी व्हईन? तुमच्या तोंडामंदी कानुले आन शेव चकली भौ. व्हऊ द्या राजे हो दिवायी यकदम झोकात. मंजी आसं का भौ मांगल्ल्या दोन वर्सात गोरगरीब निरा पिचळ्ळे ना भौ! त्याईचं पोट भराले जितलं पायजे तितलं बिन त्याईले न्हाई सापळ्ळं राजे हो. नाई म्हन्याले औंदा पावसानं साऱ्याइच्या जीवाले घोर लावेल हाये पन कसं का होईना थ्या "कौरवना" च्या जोखडातून तं जरा मोकाट श्वास घेऊन राहाले ना बाप्पा सर्वे. 
दिवायी मंजी खरं पायता सर्व्या गोरगरीबाईले चार दिस हौस मौज कऱ्याची तितली यक संधी ऱ्हायते आन म्हूनशान त्याईले दिवायीचा लयच हरिक ऱ्हायते भौ. पोट्टे पाट्टे टिकल्या, लौंगी फटाके, फुलझळ्या आन जमलंच तं मिठ्ठू छाप बॉम गीम घिऊन जठी तठी फोळत बसतात भौ. तवा त्याईची चड्डी कुकळे जाते थे पायतानी बुढ्ढे बाढ्ढे लय मजा घितात भौ. यक म्हतारं म्हंते ' पाह्य बे राम्या तुही चड्डी धरतीपकड झाली बे, धाऊ नको न्हाई तं पळशीन लडीवर आन मंग बाबू ऱ्हावा लागीन नंगा च्या नंगाच आख्ख्या दिवायीभर. तशे बाकी सर्वे मथारे बिना दाताईचा चंबू गोल करून फिदीफिदी हासू लागले भौ आन त्याईले पाहून बाकी पोट्टे राम्याले चिळू लागले. तसा राम्या त्याईले म्हंते 'सायाचेहो' गप बसा न्हाई तं घिवून जातो समदे फटाके वापस, मंग बसा ह्या खटारा गाड्याईच्या संग दिवाईत बोंबाबोंब करत. 
त्या साऱ्याईत फटाके फकस्त राम्याजोळच आसल्याच्यानं मंग सारे गप गुमान व्हतात आन आपल्याले एखांदा फटाका फोळ्याले भेटाव म्हूनशान राम्याच्या मांग ऱ्हायतात. 
तिकळे घराघरात माय माउल्याईची अल्लगच धूमधाम सुरू ऱ्हायते भौ, फरायाचं कऱ्याले कंट्रोलच्या दारी लाईन लावून जे काही सापळ्ळं थे निसून पिसूनच त्याईले दिवायी साजरी कऱ्याची सवय पडेल असल्यानं तसा काई घोर नसते पन नवी साडीचोळी नऊवारी लुगडं ह्याची कायजी घिवून मातर त्याईचं मन कातर कातर व्हते भौ. लाक डौन च्यानं समद्या घराले लाक डौन हून पळ्ळं व्हतं थे काई माय माउल्या इसरू शकत न्हाई राजे हो. जावू द्या. आपुन आपला सनवार जमीन तितला मजीत करू आन समद्याईले दिवायीच्या शुभेच्छा दिऊ. रामराम!
कवि 'रवि'

Monday, 17 October 2022

कोण जाणे

आजकाल हा भ्रम कां आहे कोण जाणे
इच्छा नसतानाही अपेक्षा कां आहे कोण जाणे
आयुष्य भर जे नाकारत आलो
त्याचे आकर्षण कां आहे कोण जाणे
त्याच्या व्यसनाधीनतेला बघून
मनात अधूरेपण कां आहे कोण जाणे 
दिनरात ज्या विचारांना कुरवाळले
त्यांच्या विषयी निरपेक्ष कां आहे कोण जाणे
एका अधूऱ्या तृष्णेची जाणीव 'रवि'
दिनचर्येत अंतर्भूत कां आहे कोण जाणे कवि 'रवि'

कृष्ण सखा पतितांचा

जगण्या क्षणभर दुःख भुलोनी
कृष्णां चरणीं जावे स्मरोनी
लीला योगे सर्व जनांसी 
लुब्ध करीं तो जगतासी
प्रेमाने भारावून भक्तांच्या 
मुग्धपणे उधळी करुणेसी
शिरीं हात तो ज्याच्या देतो
सर्व दुःख त्याचे तो हरतो
न्याय नि निष्ठा त्यांसी अती भावे
अन्यायी निर्दालन व्हावे
जगत सुखाचा मार्ग असें हा
पतीतांचा सद्भाव असें हा
कृष्ण कृष्ण ज्या लागली गोडी
प्रापंचिक तरी ......
            ..... आनंदी तो गडी
प्रापंचिक तरी आनंदी तो गडी 
कवि'रवि'
रविंद्र सरदेशमुख  
Talking Wednesday group
Pimple Saudagar 

Saturday, 15 October 2022

'पता नहीं '

आजकल ये गुमान सा क्यों है पता नहीं
न चाहते हुए भी अरमान सा क्यों है पता नहीं
ता उम्र जिसे नकारता फिरा मैं
दिल उसपे आशना क्यों है पता नहीं
देख कर उसकी तलब गोई को
जेहन में एक तकरार क्यों है पता नहीं
शामों सहर जिन खयालों में गुम था
तमन्नाएं सब्रसार क्यों है पता नहीं
अधूरी प्यास का एहसास 'रवि'
दखल में शुमार क्यों है पता नहीं
कवि 'रवि '