मनीं मानसी
दिवस रात्र अन सांज सकाळी
कसा कुठे ही भलत्या वेळी
विचार एकच...... भेदून 'चक्रा' (विचार चक्र)
विलसतसे ह्या मनीं मानसी ||धृ||
मात पिता ते जन्मा देती
संगोपन हृदयातून करीती
चुकता संतती.....दोष तयांचा!
भले झालिया 'श्रेय' देवासी ||१||
गुरू घडवितो जाणून क्षण क्षण
उणे पुरे ते शिष्याचे 'गुण'
मृत्तिकेतूनी 'हिरा' घडवितो
परि अंधारी 'स्वत:' ठेविसी ||२||
देवाचे 'आभार' कशास्तव
सर्व खेळ हा त्याचाची 'जव'
'कष्टसाध्य' ते न मिळविता
सदा कदा 'उपवास' धरीसी ||३||
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home