Saturday, 11 October 2025

राम राम भौ

राम राम भौ 
पावसानं जरा उघाड दिली तवा म्हनलं चला दिवाईच्या पयले गावाच्या आंगानं जराक फिरून येवाव. नवरात - दसरा औंदा सारं पावसाच्या सावलीत फार काई हौशीनं कोनी करतानी दिसलं न्हाई भावाइहो पन् तसं आता दिवाईले मातर खुल्लं सापळीन आसं सध्यातरी वाट्टे राजे हो, बाकी त्या पंजाबराव डखा ले म्हाईत कसं ऱ्हाईन ते. जाऊ द्या, व्हाचं अशीन तसं व्हईन ! आत्ताच काह्याले इतली कायजी कराची. लेकरा पाकराइले जराक मजा कराची ऱ्हायते तं करू देवाव.
भौ औंदा जीयशटी चा बोजा कमी झाल्याच्यानं पोट्ट्याईले फटाकडे आन्याले पैशे देतानी कंजुषी करू नका जा. बाया माया जर कां सोतासाठी काई आन्याले हौसल्या असतीन तं आनू द्या त्याइलेई त्यायच्या मतानं, तितलाच त्यायचाई सन्मान व्हईन म्हंतो राजे हो, येरी त्या बिचाऱ्या मन मारुन भागोतच ऱ्हायतात सालभर. दिवाई म्हनली कां सारे खुशाखुश दिसाले पायजात कानी भौ!?
हां सोताले पन साजरे कपळे करा भौ औंदा, जीयशटी नं अवघं मारकिट सोस्त करेल हाये तवा हयगय करू नका. 
जय भवानी 
औदांची दिवाई तुमाले साऱ्या परिवारासंगं लय आनंदाची जावो हीच मनोकामना.
कवि 'रवि' 


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home