Monday, 28 September 2026

निळ्या निळ्या आकाशात

निळ्या निळ्या आकाशात बगळ्यांची रांग 

येऊ कां रे बगळे दादा सांग सांग सांग 


काऊ दादा डोकावतो झाडामधुनी 

चिऊताई चिव चिव करी पानांमधुनी 

पोपटांची किलबिल वाटे गोड किती छान 

येऊ कां रे बगळे दादा सांग सांग सांग 


मैनाबाई येती बघा खिडकी वरी 

विलक्षण नियंत्रण आवाजावरी 

एका क्षणी भासे जणू जमलं सारं रान 

येऊ कां रे बगळे दादा सांग सांग सांग 


कवि 'रवि'