Saturday, 30 May 2026

दोस्त दिल की धड़कन होते हैं

चलती चक्की से बेजार हो कर मन थम सा जाता है 
फिर से उम्मीद जगाने को सिर्फ दोस्त काम आता है 
आनंद का आशियाना बना दिल में बसता है 
दुःख को अपना बना हमदर्दी बढा लेता है 
किसी उलझन में ना आवाज लगानी पडती हो जिसे 
वो और कोई नहीं बस अपना दोस्त होता है 
चाहे रूठे सारी दुनिया चाहे ठुकरा दे ज़माना 
भगवान से भी झगड़ने को तैयार वो दोस्त होता है 
कैसे बयां करूं वो महफ़िल ए इशरत 'रवि'
बिना बोले ही समां बांधें वो दोस्त होता है।
कवि 'रवि' 

Wednesday, 27 May 2026

सावरकर जयंती च्या निमित्ताने

आज जयंती च्या निमित्ताने विनम्र अभिवादन!
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण 
ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार 
संत तुकोबारायांच्या ह्या ओळींना अंगिकारून मायभू साठी आपल्या सह संपूर्ण परिवाराच्या आहुती साठी बालपणीच उद्युक्त झालेल्या ह्या स्वातंत्र्य यज्ञातील स्फुल्लिंगाला आज आठवताना हृदयात अनेक भावनांचा उद्रेक होत आहे. सावरकरांचा चरित्र पट सरसर करीत डोळ्यांसमोरून धावत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, थोरले बाजीराव पेशवे ह्या महान धर्म रक्षकांच्या मांदियाळीत अचूक पिरवल्या गेलेल्या या रत्नावर केवळ धर्मद्वेष्ट्या इंग्रजी सत्तेविरुद्धच नव्हे तर स्वातंत्र्य प्राप्ती नंतर हिंदुस्थानी काळ्या इंग्रजां विरुद्ध ही संघर्ष करावा लागला हा मोठाच दैवदुर्विलास आहे. 
आपल्या ध्येयाची दिशा वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी निश्चित करून देव-देश अन धर्मासाठी प्राण हाती घेऊन रक्तरंजित संघर्षात उडी घेणाऱ्या देशभक्तांच्या अद्वितीय कार्याची हेटाळणी करणारे कपाळकरंटे जेव्हा मान उंचावून समाजात वावरताना दिसतात तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती हीच की इंग्रज जरी येथून निघून गेले तरी आमच्या मधील गुलामी मानसिकता काही नष्ट झाली नाही. मुगल सत्ता काय किंवा इंग्रजी सत्ता काय दोन्ही अमानुष, क्रूर आणि हिंदुद्वेषी! त्यांच्या सत्तेविरुद्ध एखादी कुणकुण जरी लागली तरी शेकडोंच्या कत्तली करून दहशत निर्माण करणारी ही रक्त पिपासू जमात अवतीभवती असताना स्वातंत्र्य प्राप्ती चा ध्यास घेऊन अग्निदिव्य करणाऱ्या ह्या व्यक्तित्वांना अवतारी पुरुषच म्हणावे लागेल. मी आमच्यातली गुलामी मानसिकता नष्ट झाली नाही असे जे बोललो ते कां हे विशद करून सांगतो. स्वातंत्र्यवीर तात्यारावांचेच उदाहरण घेऊया. त्यांच्या प्रत्येक कृतीतून हेच दिसून येते की अन्याय आणि अत्याचाराला प्रत्युत्तर हे त्या अन्यायकर्त्यांच्याच पद्धतीने दिल्या गेले पाहिजे हा त्यांचा न्यायोचित आग्रह! आणि त्या कार्यात सिद्धता यावी, हमखास यश मिळावे यासाठी अतीशय पद्धतशीर आखणी करण्यातील त्यांची हातोटी. आपल्या शब्दांमधून क्रांतीयज्ञ सतत प्रज्वलित रहावा यासाठी त्यांनी योजीलेल्या अनेक क्लुप्त्या सर्वश्रुत आहेत आणि हे सगळे करण्याकरिता अंगिकारावी लागणारी प्रसंगी आक्रमक पण धर्ममान्य अशी आक्रमकता त्यांनी विलायतेत वास्तव्यास असल्याच्या काळात पुष्ट केली, आपल्या सोबत अनेक तरुण, वृद्धांना देखील इंग्लंडमध्ये राष्ट्रनिष्ठ बनविले आणि त्या काळात अशक्यप्राय वाटणाऱ्या अनेक धाडसी कृत्यांना सजीवत्व बहाल करून लाखोंच्या मनातील इंग्रजी सत्तेविषयीची भीती समाप्त केली. येथे आवर्जून म्हणावेच लागेल की पुढे भारतामध्ये जी प्रचंड मोठी चळवळ निर्माण होऊन इंग्रजांना पळ काढावा लागला त्याची संपूर्ण मांडणी ही सावरकरांच्या प्रेरणेने जनमानसात निर्माण झालेली इंग्रजी सततेविषयीची घृणा हेच प्रमुख कारण आहे. हिंदुंच्या मनांतील राष्ट्रभक्ती ही तात्कालिक कधीच नसते, तो स्वभावधर्म आहे, तशी जन्मतःच शिकवण मिळते. परंतु त्या राष्ट्रभक्तीला जागृत करावे लागते, अन्यथा ती घन निद्रेच्या अधीन असते आणि दैववादाच्या आहारी जाऊन बसलेली असते. सावरकरांनी जागृत केलेली हीच राष्ट्रभक्ती पुढे काही ढोंगी पुढाऱ्यांनी स्वतः ला मिळालेली देणगी समजून केवळ स्वार्थासाठी वापरली आणि स्वातंत्र्योत्तर काळात तीचा अमर्याद उपभोग घेतला.
बाबाराव काय,तात्याराव काय, किंवा नारायण राव काय हे तिघेही बंधु इंग्रजांच्या काळात आणि पुढील काळात कांग्रेसी सत्तेच्या कोपभाजनाचे कायम लक्ष्य राहिले. आज आपण बघतो आहोत अशीच काही हिंदुविरोधी नेते मंडळी आताशा उघडपणे हिंदुद्वेषाची आग ओकत आहेत आणि आमची गुलाम मानसिकता त्यावर व्यक्त होण्यासाठी सुद्धा तोंड लपवते. गेल्या काही वर्षांत सतत हिंदुंमध्ये जातीभेद निर्माण करून त्यांना विभक्त राहण्यासाठी प्रवृत्त करण्याचे अथक प्रयत्न करीत आहेत. सावरकरांनी जातिभेद नष्ट व्हावा, जाति द्वेष संपुष्टात यावा यासाठी रत्नागिरी येथे पतितपावन मंदिराची उभारणी करून हिंदू एकतेचा पायंडा घालून दिला. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण आहे. 
अंती इतकेच म्हणायचे आहे की देशातील अंतर्गत किंवा बाह्य आव्हानांना ओळखून आपला राज्यशकट यशस्वी पणे चालत रहावा यासाठी आपणच स्वयंप्रेरणेने, शासनाकडून कुठलीही अपेक्षा न बाळगता शुद्धीकरणासाठी एकत्र यावे आणि घाण नष्ट करावी.
असे झाले तरच ती खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्ती साठी जीवन अर्पण करणाऱ्यांप्रती आपली निष्ठा ठरेल. अन्यथा पुन्हा येरे माझ्या मागल्या ह्या उक्तीप्रमाणेच ठरेल.
स्वतंत्रतेला भगवती स्वरूप मानणाऱ्या विनायक दामोदर ऊर्फ तात्याराव सावरकर यांना समर्पित!
कवि 'रवि'
रविंद्र सरदेशमुख 

हे सृष्टि के रचयिता

हे सृष्टि के रचयिता 
सृजन-पालन-विनाश की तेरी लीला है 
सब जीवों को जन्माता समान है 
फिर मनुष्य क्यों निराला है 
हे सृष्टि के रचयिता 
जीवो जीवस्य जीवनम् की तेरी परिभाषा से 
मनुष्य पर क्यों निर्बंध नहीं डाला है 
हे सृष्टि के रचयिता 
परम बुद्धि का स्वामी है तू 
मनुष्य निर्माण में फिर कैसे 
तूने गलती कर डाला है 
हे सृष्टि के रचयिता 
करना है सृष्टि संयोजन गर तुझे 
तो सबसे पहले यह महसूस कर 
गलतियों का अंबार है मानव 
जिसे तूने नाजों से पाला है 
आज तेरी बनाई व्यवस्था पर 
उसने हमला बोल डाला है 
कवि 'रवि' 

Saturday, 16 May 2026

गझल:- त्या कौतुकास त्यांच्या

त्या कौतुकास त्यांच्या मी पात्र ना कधीही 
दिसली 'सुखार्त स्वप्ने' अशी रात्र ना कधीही

क्षण एक तो सुखाचा मजला छळून जातो 
दुःखात ही 'विसावा' मज मात्र ना कधीही 

'दंशास भावनांच्या' नच एक ही उतारा 
ते हास्य 'शुष्कतेचे'....सर्वत्र ना कधीही 

येथील जीवनाला 'भ्रमलेप' चिंब जडला 
पडतील 'स्वाती बिंदू' मज खात्री ना कधीही 

ऐकोनी त्या सुरांना गंधर्व 'क्रांत' झाला 
'रवि' त्याच 'आर्तते' ला तू पात्र ना कधीही 

कवि 'रवि'

Wednesday, 13 May 2026

मोदी एक न उलगडणारं कोडं

जीवनाच्या सारिपाटावरील सोंगट्या नशीबाच्या हातात असतात अशी संभावित प्रथा आपल्याकडे आधीपासून प्रचलित आहे. एखाद्या कार्याला आपण वाहून घ्यावं, त्यात यशस्वी होण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न करावेत पण कुठेतरी माशी शिंकली की सारं काही धुळीस मिळावं अशी स्थिती निर्माण झाली की नशीबाला दोष देऊन निवृत्त व्हावं ही मनुष्य स्वभावाची रीत आहे. परंतु नरेंद्र दामोदरदास मोदी नावाच्या एका व्यक्तीला आपल्या बालपणातच एक अद्भुत मंत्र कुणाकडून कुणास ठाऊक पण मिळतो काय आणि ह्या बालकाने त्याला आपल्या आयुष्याचा परवलीचा शब्द बनवावा काय, सगळंच विलक्षण, अतर्क्य.
कुमार वयात येन केन प्रकारे शिक्षण आणि घर चालवण्यासाठी आपल्या पित्याला सहकार्य करताना काय धडपड करावी लागते ती शब्दाद्वारे व्यक्त करणं सोपं खचितच नाही त्या साठी जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे असेच म्हणावे लागेल.  अशा सगळ्या अवघड परिस्थितीतून मार्ग क्रमण करीत असताना एके दिवशी रा स्व संघाच्या गुजरात प्रांतातील ज्येष्ठ प्रचारक आदरणीय लक्ष्मणराव इनामदार यांच्या दृष्टीस हा बालक पडतो आणि त्यांनी त्याला बाल स्वयंसेवक म्हणून संघकार्यात रुजू करून घ्यावे ही एक प्रकारे दैवी योजना असावी. नरेंद्र मोदींचा संघ प्रवास वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी सुरू झाला हे वाक्य ऐकताच आपल्या पैकी अनेकांना आपलं बालपण आठवलं असेल हे उचितच आहे. आपल्या पैकी बहुतेकांनी लहानपणापासूनच संघ शाखेत जाणं आवडीने अंगिकारलेलं आहे आणि तो प्रवास आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. असो, थोडं विषयांतर झालं पण ते क्रमप्राप्त होतं.
आपल्या मराठीत एक म्हण आहे  कुंभाराचा घडा चाकावर असेस्तोवर जसा घडविलं जाईल तसा पुढे तो फुटेपर्यंत कायम राहतो. वरील उक्तिचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आजच्या घडीला भारतीय राजकारणात प्रभावी पणे कार्यरत असलेल्या अनेक नेत्यांकडे बघता येईल. अशाच नेतेमंडळींचा मेरुमणी आहे नरेंद्र मोदी. आपल्या संघ जीवनातील प्रत्येक दायित्वाला योग्य तो आयाम देणारा हा तरुण एक दिवस अचानक ऐहिक जीवन त्यागून तपश्चर्या करण्यासाठी प्रवृत्त होतो, अनेक वर्षे तप: साधना करून पुन्हा एकदा संघकार्यात सक्रिय होतो, प्रचारक म्हणून, भाजपचा संगठन मंत्री म्हणून आपल्या जीवनाला संघ आणि भाजप या दोन्ही समाजाभिमुख अशा परंतु स्वायत्त संस्थांशी निगडित राहू शकतो हे खरं संघटन कौशल्य आहे.
बारा वर्षे गुजरात राज्यातील शासन व्यवस्था मुख्यमंत्री पदावर राहून सांभाळताना त्यांनी ज्या अनोख्या कल्पना कार्यान्वित केल्या त्यांना एक निराळीच मान्यता जगभरातील सर्वच देशांमध्ये प्राप्त आहे. भारतात देखील गुजरात मॉडेल अशी संकल्पना प्रचलित झाली आणि आजही मान्यता मिळवून आहे. मोदींचं पंतप्रधान होणं हे सुद्धा असंख्य अडचणींवर मात केल्या नंतर साध्य झालं आहे, विशेष करून त्या काळातील सत्ताधारी पक्ष मोदी यांचं पंतप्रधान पदाकरीता नामांकन झालेलं बघून प्रचंड धास्तावला होता. त्यांच्यावर अनेक प्रकारे आरोप केले गेले, अन्याय पूर्ण कारवाया सुरू केल्या गेल्या, आणि विदेशी शक्तिंना हाताशी धरून त्यांना संपवण्याचा देखील प्रयत्न केला गेला. राजकारणात उंची गाठत आहे हे बघून त्यांचं चारित्र्य हनन करण्याचा देखील प्रयत्न केला गेला परंतु कुठल्याही क्षणी आपला तोल ढळू न देता हा स्वयंसेवक खंबीर राहिला. २०१६ मधील नोटा बंदी हा किती धाडसी निर्णय होता ह्याचं कथन त्यांनी त्यावेळी आपल्या भाषणातून केलं आहे, त्यांनी म्हटले आहे की ह्या निर्णयाचा परिणाम म्हणून मला जीव ही गमवावा लागणार आहे तरीही मी ही नोटा बंदी देश हितासाठी राबविणारच. पुढेही असे अनेक प्रसंग आहेत ज्या वेळी त्यांना ईश्वरी शक्तीची साथ मिळाली म्हणून ते आजही आपल्यात आहेत. देशांतर्गत हितशत्रू तर आहेतच पण परदेशात देखील ज्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेला नाचवायचे मनसुबे रचले जात आहेत ते तथाकथित डीप स्टेट वगैरे सारखे शत्रू सतत कार्यरत असतात. 
अगदी अलीकडे झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांनी जी भाषणे केली आहेत त्यातून त्यांनी आपल्या मनातील भावना आणि देशापुढील आव्हाने अगदी सोप्या भाषेत सांगितली आहेत.
मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती भारता सारख्या विकासाच्या वाटेवर घोडदौड करणाऱ्या देशाला खीळ घालणारी आहे आणि अशा कठीण काळात समग्र भारतीय समुदायाने यांचं भान राखून व्यर्थ खर्च कमी करावेत अशा आशयाचं त्यांचं भाषण काही उपद्व्यापी पत्रकारांना सोयीचे वाटल्याने त्यांनी मोदी विरोध करताना देशहित धाब्यावर बसवले आहे. 
स्वयंसेवक म्हणून आपण समाजात वावरताना काही अलिखित नियम आपण सतत पाळत आलो आहोत, समाजाच्या सर्व स्तरांतील जनतेला राष्ट्रहित कशात आहे हे सोप्या सरळ भाषेत आपण सांगत असतो. थेट इमर्जन्सीच्या काळा पासून ते २०१४ साली, २०१६साली आणि अशा प्रत्येक दुर्धर प्रसंगी आपण आपल्या कर्तव्यात कसूर ठेवली नाही. परवाच्या मोदींच्या हैदराबाद येथील भाषणाचा संदर्भ घेऊन मला जे काही कळलं त्याचा मतितार्थ असा आहे की येणाऱ्या काळात आपला समाजातील वावर अधिक प्रभावी आणि समाजाची दिशाभूल होण्यापासून रक्षणार्थ असावा.
रविंद्र सरदेशमुख 

Tuesday, 12 May 2026

गझल:अन्वयार्थ

न स्वतः साठी ना जमान्यासाठी मित्रांनो 
आता जगणे उरले फक्त श्वासांसाठी मित्रांनो 
देहाची धडपड आणि मेंदूचा वेग उगाच छळतात 
वावटळीच्या वेदना अखेर विरतातच मित्रांनो 
डोळ्यांची झाकणं कधी उघडी-बंद सवयी नुसार 
अंतरीच्या काळोखाची घुसळण व्यर्थच मित्रांनो 
देह-देव-निसर्ग आणि प्रारब्ध जीवनाचं संचित सारं 
श्वासांना श्वासाचं महत्व देतात मित्रांनो 
अखेरची बाब म्हणता म्हणता अखेर कधी येत नाही 
श्वासांना विराम मिळताच पुन्हा नवी सुरुवात मित्रांनो 
जन्मोजन्मीचा हिशोब ठेवाणरा तो "स्वर्गस्थ" 
कधी 'शाई संपली' असे नमूद करेल कां मित्रांनो 
कवि 'रवि' 

Monday, 11 May 2026

फुजूल है

वक्त गुजर जाने के बाद की 
तकरीरें फुजूल है 
नफ़रत दिल में दरख़्त बन गई हो तो 
नुमाइश ए इशरत फुजूल है 
अपनी तस्वीर में जहां खोजने वालों 
किसी इबादतगाह पर टिकी 
पेशानी फुजूल है 
चंद बनते हैं हमसफ़र 
मंजिल की तलाश में 
वक्त के साथ चल न सके तो 
राहबानी फुजूल है 
कवि 'रवि'

Tuesday, 5 May 2026

नज़्म: उलझन

नज़्म 
दरो दीवार को 
तूफान से बचाएं कैसे 
शदीद है मौसम छप्पर को 
संवारें कैसे 
तेरे ख्यालों में खोये रहते हैं 
मज़ा आता है 
हकीकत से नुमाया होने से 
खुद को बचाएं कैसे 
वो कहते है अक्सर 
मुश्क की रफ़्तार बताओ 
इश्को जज़्बात पर नहीं होता ज़ब्त 
बताएं कैसे 
हुए नामवर अज़ल से अब तक 
फना ही तो हुए 
ज़िंदा रहते हैं अल्फाज़ क़यामत तक 
सुझाएं कैसे 
मेरी गुमशुदगी 
मेरे किरदार को पसंद आती है 
लंबी होती हुई परछाईं को 
खुद से छुड़ाए कैसे 
अकीदतमंद मैं 
हर पल इत्मिनान रखता हूं 'रवि'
हाले दिल फिर भी बेकाबू हैं 
सुनाएं कैसे 
कवि 'रवि' 

Monday, 4 May 2026

बंगाल तब का और अब का

बंगाल के विषय में कुछ कहने से पहले एक विशेष महत्व की बात को मैं उद्धृत करना चाहता हूं कि "बंगाली जनता का मूल स्वभाव क्रांतिकारी है"! 
विधानसभा चुनाव २०२६ के नतीजे आज ममता बनर्जी के तृणमूल कांग्रेस को हराकर भारतीय जनता पार्टी को जीत रहे हैं। बंगाल की राजनीति की विभीषिका यह है कि बंगाल में सदैव ही कुछ ऐसे तत्व पूरी जनता पर भारी पड़ जाते हैं जो उनके शोषण के सिवाय उन्हें कुछ नहीं देते।
आइये समझें बंगाल का कल और आज!
भारत के स्वतंत्रता संग्राम में प्रखरता से सहभागिता करने में, संघर्ष की बलि वेदीपर अनेकों आहुति देने वाले राष्ट्रभक्तों में बंगाल - महाराष्ट्र - पंजाब प्रमुख प्रांत हुआ करते थे। महाराष्ट्र और पंजाब को स्वतंत्रता पश्चात् जो शासन व्यवस्था मिलती गई वो बंगाल की व्यवस्था से आजतक भिन्न रहथी रही है।
शुरुआत में बंगाल में भी कांग्रेस की सरकारें १५ वर्ष तक रही। लेकिन, स्वतंत्रता प्राप्ति के तुरंत बाद ही वहां असंतुष्ट विचारधाराओं ने पुरजोर तरीके से काम किया और साम्यवाद की जड़ें मजबूत बनती गई। नक्सलवाद को जन्म देने वाले नेता उस समय के उच्च शिक्षित थे। बंगाल में इस हिसाब से एक नयी क्रांति पनप रही थी, साम्यवादी नेता यशस्वी हुए और एक लंबे अरसे तक बंगाल साम्यवादी सरकार के अधीन रहा। 
मित्रों, बंगालियों का एक स्वाभाविक दोष है कि वे क्रांति तो कर लेते हैं परंतु, उसके बाद अपने भोलेपन से उन नेताओं पर एक तरह से अंधा विश्वास रखते हैं। कांग्रेसियों से मोह भंग हुआ तो साम्यवादियों पर भरोसा कर बैठे। साम्यवादियों से उकता गए तो फिर से कांग्रेस की असंतुष्ट नेत्री ममता बनर्जी पर अंधविश्वास दिखाती रही।३५ वर्ष कम्युनिस्टों के और १५ वर्ष तृणमूल कांग्रेस के उनका भ्रमनिरास होने में लग गए। बंगाल के आसपास के राज्य बारंबार उन्हें यह समझाते रहे कि ममता सरकार उतना ही निर्मम है जितना कम्युनिस्ट सरकार हुआ करता था। खैर, अब क्यों न हों लेकिन अंधेरा छटा है और कंवल खिला है।
मैं इसे भी बंगालियों के विचार प्रवर्तन का अनूठा उदाहरण ही मानूंगा!
बदलते समय की आवश्यकता है कि बंगाल सार्वभौमिकता का पुरस्कार कर समग्र भारत की संकल्पना को रचाने बसाने में ठीक वैसा ही योगदान दें जैसा स्वतंत्रता संग्रामके समय हुआ करता था। 
मैं अपेक्षा करता हूं कि चुनी हुई नयी भाजपा सरकार बंगाल को उसकी राष्ट्रीय अस्मिता पुनः प्रदान करेगी। वहां के भद्रलोक और आम जनता में लोकप्रियता प्राप्त करेगी और इस क्रांतिभूमि के माध्यम से अखंड भारत की नींव रखेगी।
भारत माता की जय 
वंदे मातरम्!
कवि 'रवि'