Friday, 16 October 2026

गझल: आयुष्याशी लढलो इथवर

आयुष्याशी लढलो इथवर 
आता विसावा पाहिजे 
काळसर्पा तुज विनंती 
एक चावा पाहिजे 
काळ वेळाची युती 
एकदा व्हावी अशी 
निष्पर्ण वृक्षासी आता 
ठिणगी मिळाया पाहिजे
वावटळ अंतर्मनातील 
शमली ना अजुनी जरी 
विस्तवाची राख झाली 
हे कळाया पाहिजे 
पंचतत्वांच्या ऋणांची 
मांडू मी गणिते कशी 
'रवि' राहिला जो शेष अजुनी 
तो जुळाया पाहिजे 
कवि 'रवि' 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home