Wednesday, 10 June 2026

आमच्या लहानपणी

शाळा-मास्तर-घंटी-सुट्टी सारं टाईमशीर 
आमच्या लहानपणी 
चादर फेकून लगबगीनं उठायचो 
आमच्या लहानपणी 
देव ही होता भक्तवत्सल कृपावंत 
आमच्या लहानपणी 
पावसाची हजेरी रोहिणी पासूनच 
आमच्या लहानपणी 
वाजत गाजत विजा चमकवित बरसतसे तो 
आमच्या लहानपणी 
घायकुतीला शेतकरी, पेरण्यांची धडपड चाले 
आमच्या लहानपणी 
सरता श्रावण येई पोळा कृतकृत्यतेचा सोहळा 
आमच्या लहानपणी 
निसर्ग चक्राच्या अधीन होते
 सारे पण समाधानी 
आमच्या लहानपणी 
आता मात्र केवळ आठवणी काय काय घडले तेंव्हा 
आमच्या लहानपणी 
कवि 'रवि' 


Monday, 8 June 2026

आठोळी:- इंडी ची बंडी

आठोळी:- इंडी ची बंडी 
इंडीच्या रस्त्यावर मैलच नाही 
इंडी च्या बंडीला बैलच नाही 
इंडी ची सतत ची हेवड चाल 
खीळ नसल्याने बंडीचा झालाय बुरा हाल 
दोर ज्याच्या हातात तो झोपी गेलाय 
विवेकशील विचार जन्मापूर्वीच मेलाय 
आज पुन्हा एकदा झालेत वाऱ्यावर स्वार 
ठरवताहेत कसा करावा एकमेकांवर वार 
कवि 'रवि'

Saturday, 6 June 2026

झुरळाख्यान

आठोळी:- झुरळाख्यान 
झुरळ बघ विमानाने आलं ग बया 
झुरळांना रोपटं लावलं ग बया 
झुरळाची पैदास खूप झाली ग बया 
रामलीला मैदान झुरळमय झालं ग बया 
झुरळाच्या भेटीला झुरळांची झुंड 
म्हणती आता देशभर होईल झुरळांचं बंड 
आठोळीत झुरळांना वर्णू मी किती 
पेस्ट कंट्रोल ची सुरुवात होईल तरी कधी 
कवि 'रवि' 

Tuesday, 2 June 2026

आठोळी:- तरणोपाय

आठोळी:- तरणोपाय 
म्हाताऱ्या पार्टीचा म्हातारा 'तरुण'
जेन झी ला उचकवतोय 'कॉक्रोच' ला धरुन 
सोरोस ला सोसवेना 'डीपस्टेट' ची कळ 
मोदी ला संपविण्या लावतोय पैशाचं बळ 
भारतात कोणी ह्यांना भीक नाही घालायचं 
विकासाच्या वाटेवर असलं काही नाही चालायचं 
देश आणि धर्म आमचं आहे सर्व काही 
ढोंगी बगळ्यांना आता येथे उरला ठाव नाही 
कवि 'रवि' 

आठोळी:- कोण नात्याचा

आठोळी:- कोण नात्याचा 
जया त्वा निवडुनी दिधले भासे तव तोच नात्याचा 
परंतु अंतरी त्याच्या निश्चित असे 'कोणी ना त्याचा'
जसे ते भाग्य त्याचे उजळले तुझ्या त्या एक मताने 
जमे जसजशी लक्ष्मी न राही बोध 'नात्याचा'
जमवी ती टग्यांची टोळी भोवती रक्षावया त्याला 
जयांनी निवडुनी दिधले विसरला भाव 'नात्याचा'
उड्डाणे कोटी च्या कोटी कशास्तव पर्वा मग उरली
येई जव ईडी घरालागी शोधी तो 'कोण नात्याचा'
कवि 'रवि' 

आठोळी:- एन्काऊंटर

आठोळी 
विषय:- एन्काऊंटर 
मित्र मित्र म्हणून त्याला विश्वासात घेतले 
बकरा कापण्याचे प्रात्यक्षिक मात्र त्याच्या वरच बेतले 
जमली पाच खोपडी मस्तकात बकऱ्याचा भेजा 
गळा कापताना मित्राचा कळवळला नाही कलेजा 
चरचर चिरला गळा रील बनवून उन्माद ही केला 
त्यांना वाटलं हिंदू काफिरच तो मेला तर मेला 
उमजलं नाही अजूनही त्यांना वर बाप योगी आहे बसलेला 
कळताच त्याला झटपट ऍक्शन अन् एन्काऊंटर झाला बघा एन्काऊंटर झाला 
कवि 'रवि'

आठोळी क्र १

आठोळी:-
शाई गेली, पेन गेला 
गेला कागदांचा जमाना 
बॅटरी संपली की हमसून हमसून 
मोबाईल वाले करतात ठणाणा 
पाकिट नाही नोटा नाही 
गेले चलनी शिक्के 
नेटवर्क नसता करती आदळ आपट 
घालती स्वतःच्याच पाठीत बुक्के
"आठोळी" ह्या नवीन काव्य प्रकाराचा आनंद घ्या मित्रांनो आणि 
अगदी खूपच बरं वाटलं तर मला शाबासकी जरूर द्या कारण "आठोळी" जन्माला घातलीय.