शब्द स्तब्ध
शब्द माझे लेखणीला भावगाथा ऐकवीती
लेखणीतून भावना त्या शब्दरूपे उमटती
त्या तिथे किंवा इथे ही
कोण आहे सोबती
सत्य जाणो नी तरीही कोण चिंता सोडती
जीवनाच्या दोन तारा मोकळ्या टण्कारती
अन तरीही ऐकताना एकची त्या भासती
चार भिंती बांधल्या मीच माझ्या भोवती
विश्व हे कि ते कळेना कल्पना भांबावती
वास्तवाचे भान ठेवू की स्मरू स्वजनांप्रति ऐकुनी प्रश्नास माझ्या शब्दही पाणावती
शब्दही पाणावती
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home