Monday, 7 June 2021

कोळिणीची 'व्यथा'

सांजवेळी मन होई कातर कातर
मावळला दिस कसा येईना भ्रतार
उधाणला दर्या वारा उधळूनी वाहे
नवतीची नार वाट एकटक पाहे
सिंह माझा वर मोठा हिंमतीचा थोर
येईल क्षणात मना लावू नको घोर
 त्याच्या सवे माझा जीव असा की गुंतला कोळ्याच्या जाळ्यात जसा मासा की गुंतला सुखरूप तया "देवा" येऊ दे घरासी
नवस बोलते येऊ तुझ्या दर्शनासी
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home