Monday, 7 June 2021

क्रांति

होय आता घ्या मशाली

तुम्हीच से स्फुल्लींग व्हा

गत सदीतील सुप्त ते

उत्स्फूर्त तुम्ही बिंग व्हा

कालची किंवा उद्याची

जयांसी नाही तमा

त्या अधमांना कराया

नष्ट तुम्ही शस्त्र व्हा

घोट घेती हे सदोदित

मायभूच्या रुधिराचा

मिटविण्या तयांची सद्दी

तरुणांनो तुम्ही सज्ज व्हा

ही नसे मम प्रार्थना किंवा नसे ही याचनाही टिकविण्या अस्तित्व तुमचे स्वावलंबी मर्द व्हा
कवि 'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home