भजन
चाल :- जिया बेकरार हैं
घेतो तुझे नांव रे.
देवा मला पाव रे
शरण मी आलो तुजला
आता तरी धाव वे ॥ धृवपद।।
काशी झाली मथुरा झाली
झाली चारही धामे हो... २
पावन व्हावा जन्म हा माझा
केवळ तुझिया नामे ॥ १॥
गंगा यमुना गोदा क्रिष्णा
झाली सारी स्नाने हो....२
मन माझे पण शुद्ध पावते
तुझिया पद स्पर्शाने ||२||
जप तप करुनी पुष्य पावलो
केली अनंत दाने हो....२
चिरशांति परि मजसि मिळाली
तुझिया दर्शनाने ||३||
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home