आवाहन
हे ईश्वरा परमेश्वरा
सर्वोपरी सर्वेश्वरा
तू देव की........अल्लाह तू
आकाशिचा तो बाप की
सृष्टीस ह्या निर्वाह तू
सर्वज्ञ तू सर्वस्व तू
तुझिया कलांचा मर्मज्ञ तू
असतां अशी ख्याती तुझी
तरिही कसा मग भांडवीशी
परमेश्वरा सर्वेश्वरा
ये एकदा धरती वरी
दे प्रेमची सर्वांपरी दे...... प्रेमची सर्वांपरी
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home