Monday, 14 June 2021

स्मृती आणि क्लेश

छेडीत तार असतां
सूर वेदनाची झाले 
आर्त नादासवे
 मन भरकटून गेले 
हळूवार कां फुलाव्या
जखमा जुन्या मनींच्या
कां अश्रूही असे मज 
अर्ध्यात सोडूनी गेले 
मृदगंध सोडूनी कां
 आभाळ ते विसावे
 तरी बंध रेशमाचे 
कां ते तुटोनी गेले
या पाकळ्या उगा कां
स्मरतात त्या स्मृतींना 
आनंद जीवनाचे सारे विरुन गेले कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home