Monday, 14 June 2021

कुणा काय द्यावे..

कुणा काय द्यावे, मला ते कळेना
कसे धन्य व्हावे , मला ते कळेना
जगी सर्व कांही भ्रमाचे तमाचे
कसें साचवावे, मला ते कळेना
जरी दृष्टी माझी सदा शोधिताहे
कुणा स्वीकृती दे मला ते कळेना
असे रोज चिंता नसे भान कांही
कसे ध्येय पावे मला ते कळेना
करू साधना की स्मरू त्या नियंत्या
धरू पाय त्याचे मला ते कळेना
कवि 'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home