याचना
माझिया हृदयातुनी गं
तू कधी जाऊ नको
आंधळ्या विश्वात माझ्या
तू भले... राहू नको
मोड ती सारीच वचने
जी दिली होती मला
भूतकाळीच्या दिसांना
पुन्हा कधी पाहू नको
कानी येता साद माझी
अधीर तू होऊ नको
भंगलेल्या त्या सुरांना
पुन्हा कधी गाऊ नको
भेट चुकुनी जाहली जर
अश्रुमय नको
विखुरल्या वाटेकडे गं
तू कधी धावू नको
मी तुला पाहीन जरिही
तू तसे दावूं नको
फाटक्या नेत्रांत माझ्या
पुन्हा कधी मावू नको
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home