विनवणी
निः शब्द कां मन आज हे
माझ्या व्यथा सांगू कुणां
हल्केच कां तू मिटविल्या
मम आठवांच्या त्या खुणा
येताच त्या वळणावरी
पाऊल अजूनी अडखळे
वळणावरी वाटाच तुटल्या
वेड्या मनाला ना कळे
कोमलांगी तू तरीही
मन तुझे इतके कठोर
लू जरी कां लुप्त झाली
करीतो प्रतिक्षा हा चकोर
ये पुन्हा ये एकदा
ये एक क्षण भेटावया
माझिया थडग्यावरी पाकळ्या ओतावया
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home