Sunday, 13 June 2021

तफावत

वाटेवरचा आंधळा, 
ओरडून ओरडून भीक मागतोय 
मस्तीवाला धनदांडगा 
गाडीमधूनी भुर्र पळतोय 
दैव दिले जर देवाने, 
तर दैवाचा हा खेळ कसा 
शेर (स्वतः ला) समजुनी गुंड मवाली, 
गरीब जनांचे शिर फोडतोय 
डोंबाऱ्याची कसरत बघुनी, 
बघा बघे टाकिती टाळ्या 
पैसे द्या हो ! हात पुढे जव, 
एकेकची तो पाय काढतोय 
ज्या रक्ताच थेंबही झिजतो 
तुमच्या अमुच्या सेवेला
 मोबदला देण्यास्तव कां पण 
हात खिशाशी हा अडतोय 
बघता बघता सारे जग हे 
स्वार्थाने की बरबटले
 पैशासाठी अधम हो एक तो
 माय बहिणीला ही विकतोय
अरे नियंत्या तुझीच सारी 
तूच तयांना जन्मविले 
ऐसे असूनी परस्परां स्तव 
भेदभाव तू कां करतोय
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home