अपेक्षा
माणसातल्या माणसाला
कधीतरी जाग येईल
शुद्ध अंतःकरणे तो सृष्टीकर्त्याकडे पाहील पाहील जेंव्हा, कळेल त्याला
त्याच्या मनातील आर्तता
सृष्टी नियंता तो जरी
त्याची माणसापुढील असहायता
कल्पनेच्या अत्युच्य समयी
तयाने
मानवाते निर्मिले
जे न द्यावे कोणासही
ते सर्व तुजला वाहिले
वाहुनी वर आणखी
वरदान ते दिधले असे
साध्य तू करिशील ते
जे तुला स्वप्नी दिसे
मानवाने आजवर
केला त्याचा भ्रमनिरास
केवढी परमोच्च परीची
होती तुझ्याप्रती त्याची आस
स्वार्थ मद उन्मत्तता
व्यापात तू जव गुंतला
निर्मितांनाचा तुला
त्याचा विचारच भंगला
हो आता चाणाक्ष तू
कर प्रेम तथा धरतीवरी
एकदा का होईना, कर अपेक्षा तू पुरी
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home