Saturday, 12 June 2021

वर्षला हर्ष

पहिला पाऊस

या ऋतुत शुभ्र कळ्यांच्या रुपाने बरसला
चित्तवृत्ती
मोहरल्या
आसमंत बहरला
थरथरत्या पानांच्या अंगी 
सुखाव्याची ऊब आली
रणरण तापलेली धरित्री गार झाली
उन्मादल्या त्या क्षणी
बागडती राने वने
शुष्कल्या पुष्करणी 
गीत गाती ते जुने 
अनाकलनीय दृष्य ते
मोद भरुनी वाहतो 
पहिल्या वर्षेस मीही
अपूर्वाईने पाहतो
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home