Saturday, 12 June 2021

नियंता आणि मी

घनदाट ज्याची साऊली
निष्पर्ण आज झाला
दिवसासवे जैसा 
तेजोमय सूर्यही निमाला 
गूढ अनंताचे कळेना
कां करी ही मस्करी
बनवुनी अद्‌भूत मूर्ति
कां असा लुडवी परी
नितनवे निर्माण करितो 
अन् पुन्हा करितो जुने
तेजात अंधारास भरितो 
वलयांकित पडिती उणे 
विविध अंगी, विविध रंगी
तु तसा आहे खरा
वागतो तू ज्या तऱ्हेने
हा छंद तुजला ना बरा
ही तुझी सृष्टी चिरंतन
तूच तो सर्वज्ञ स्वामी 
तरिहि तव हे वागणे 
समजण्या असमर्थ मी
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home