Saturday, 12 June 2021

पाऊस आणि चराचर

सुसाट  वारा
घोंगावत रानात शिरला
पाठोपाठ 
आकाशात काळा ढग दिसला
टप टप रट रट
थेंबांचा वर्षाव झाला 
पाने, फांद्या डोलवित
अवघा रान नाचला
मातीच्या गंधाने 
मुग्ध पशु पक्षी
आनंदे बागडल्या
तरु वल्लरी दाही दिशी
शुष्क कंठ धरणीचा 
जल प्राशुनी सुखावला
पाहुनी पावसाला
आसमंत विसावला
ये असा चौमास तू
भरुनी जल स्त्रोता सवे
धरती वरल्या जीवनाला
तुज पासुनी इतके हवे
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home