विलोभनीय
श्याम कुंतल, मोगरा शुभ्र वरी शोभितो
येतो सुगंध कोठुनी, भ्रमरापरी भी शोधितो रात्र चंदेरी तयातच प्रखर तूही चांदणी
कांही समजेना मनाला
कोणास हा मी शोधितो
बघूनिया तव रूप सुंदर चंद्र ही बघ लाजला करुनिया तुलना मनातच, उत्तरा मी शोधतो उधळले सर्वस्व तुजवर सृजनकर्त्याने बरे. आणखी वर मोगराही हे कसे, मी शोधितो देखोनि तव मुख चंद्रमा
शत सूर्य ही ते भाळले
कां नसे तुजला तमा विस्मये भी शोधितो
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home