Sunday, 6 June 2021

भजन श्री विठ्ठलाचे

परम सदगुरु नाम ऐकुनी
भक्तीमय झालो
विठ्ठला तुजपाशी आलो ||धृवपद||

दीन दुबळ्यांचा तू कैवारी
पापियांसही तू भयहारी
भयभीत झालो आज म्हणोनी
तुजपाशी आलो | विठ्ठला ॥१।।

तुझिया चरणीं विश्व नाचते 
तुझ्या दर्शने दुःख हासते
चैन पडेना आज म्हणोनी 
तुजपाशी आलो | विठ्ठला ||२||
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home