अर्चना
शब्दांच्या लाटांवर होऊनी स्वार
सखे चल धुंद होऊया
शब्द सागरातून मंथुनी
शब्द रत्न ले भरुनी आणुया
मधुगंधा सम मज मस्त करुनी
हे शब्द धावती पुढे पुढे
भ्रसरा सम भी अत्र तत्र
धावतो तयांच्या धुंदी कड़े
देतात मजसी ते स्फूर्ति, शक्ति
अन देती अवसान
सत्य सांगतो सखे तुजसी मी
उर्मि गीतांची तुझ्याकडे
जोवरी देशील साद तोवरी
फुलतील माझी शब्द फुले
तुझ्याविना तर अक्षर दुर्लभ
शब्द मागू मी कुणाकडे
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home