Monday, 14 June 2021

ये ना एकदा

नव नयनांची शस्त्रे 
माझे छेदन करुनी जाती 
कुठेतरी पण जखमा 
मजला सुख देवोनी जाती
कां लागे हुर हुर अखंडीत
 जरी तू कधी ना दिसशी 
केवळ तव नयनांची धडपड 
आठवते गे  मजसी 
पुन्हा एकदा आणि पुन्हा 
तू वळुनी बघ ना जरा 
शब्दाविणही कळेल तुज मी
तुझाच मैतर खरा
येशील जरी का जिवनी माझ्या
विश्वची वाहीन तुला
विद्ध माझिया त्या नयनांनी 
बघतची राहिन तुला
कवि 'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home