Saturday, 12 June 2021

आभार

आभाळातलं पाणी 
भूमिवरी आणी
उपकार कर्त्या वाऱ्या 
आम्ही तुझे ऋणी
आभाळातलं पाणी
जेव्हा झुळुझुळु वाहे
लहानगं पोर 
त्याला टुकुटुकु पाहे
आभाळातलं पाणी
जेव्हा शेल भिजविते
धरणीची माझ्या
तेंव्हा कुस उजविते
आभाळातलं पाणी
जेंव्हा पडे अंगावरी 
नवतीची उरी तेंव्हा येई शिरशिरी
आभाळातलं पाणी 
भरी तुडुंब पाटवे
वेड्या मना माझ्या 
नवं गाणं ही आठवे 
आभाळातलं पाणी
पड़ो ऋतु काल माने 
बळीराजा माझा 
जावो भऊन सुखाने
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home