Tuesday, 8 June 2021

अहंकार

अहंकाराचा जनक 'तिरस्कार' आहे. जर कां एखाद्या व्यक्तीला समाजातील सर्व स्तरातून सतत अपमान, घृणा, तिरस्कार या गोष्टींचा सामना करावा लागला, मग तो गंमतीतून असो, चिडवण्यातून असो, टाळण्यातून असो किंवा ईर्ष्येतून असो. ज्यावेळी व्यक्ती अन्याय होत असल्याच्या भावनेने ग्रस्त होत जातो, त्यावेळी त्याच्या मनात अहंगंड निर्माण व्हायला लागतो. एक कारण आणखी आहे ते म्हणजे कुवतीपेक्षा जास्त मिळणे! आणि एकदा अहंगंडाने मनात घर केले की मरेपर्यंत त्यातून सुटका नाही.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home